आयएएस बदल्या वरून न्यायालयीन पेच!-IAS Transfer in Court!

IAS Transfer in Court!

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात (SSC–HSC Board) अध्यक्ष म्हणून करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याविरुद्ध आता थेट न्यायालयाची पायरी गाठण्यात आली आहे.

IAS Transfer in Court!

त्यामुळे त्रिगुण कुलकर्णी हे पुढे अध्यक्ष म्हणून टिकणार का, की त्यांना बदलीपूर्व पदावर परत जावं लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातली पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

याआधी राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नेहमीप्रमाणे शिक्षण विभागातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होत आली होती. पण यावेळी पहिल्यांदाच एक आयएएस अधिकारी या पदावर विराजमान झाले. दोन–तीन दिवसांपूर्वीच त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.

शिक्षण विभागातील सहसंचालक दर्जाचे अनेक अधिकारी पुढील काही वर्षांत संचालक व अध्यक्ष पदासाठी पात्र होऊ शकणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की –
“पदोन्नतीच्या आमच्या संधी हिरावू नयेत; शिक्षण विभागातीलच अनुभवी अधिकाऱ्यांना अध्यक्षपद मिळायला हवं.”

म्हणूनच या बदल्याविरुद्ध शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अलिकडच्या वर्षांत शिक्षण विभागातील महत्त्वाच्या पदांवर आयएएस अधिकाऱ्यांचीच नियुक्ती होत आहे

  • शिक्षण आयुक्तपदावर आयएएस,
  • शैक्षणिक संशोधन परिषदेत संचालकपदी आयएएस,
  • परीक्षा परिषदेचे कामकाज महसूल विभागातील अधिकारी पाहतात.

मागील वर्षी पुणे विभागीय शिक्षण मंडळात झालेल्या प्रति-नियुक्तीलादेखील न्यायालयाने स्थगिती दिली होती.

आता पुन्हा शिक्षण विभागातील पदोन्नतीस पात्र असलेले अधिकारी एकत्र येऊन न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय या प्रकरणाला कोणत्या दिशेने नेतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments are closed.