महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केला HSC आणि SSC परीक्षांचा सविस्तर वेळापत्रक 2026 साठी! | Maharashtra Board Announces HSC-SSC 2026 Timetable!
Maharashtra Board Announces HSC-SSC 2026 Timetable!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर 2026 सालच्या बारावी (HSC) आणि दहावी (SSC) परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी आतुरतेने वाट पाहत असलेले हे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर — www.mahahsscboard.in — उपलब्ध आहे.

जाहीर वेळापत्रकानुसार, बारावीच्या (HSC) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 रोजी संपणार आहेत. त्याआधी, प्रात्यक्षिक, मौखिक आणि अंतर्गत मूल्यमापन चाचण्या 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील.
दरम्यान, दहावीच्या (SSC) लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात येतील, तर मौखिक, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत चाचण्या 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होतील.
मंडळाने यापूर्वी फक्त परीक्षांच्या प्रारंभिक तारखा जाहीर केल्या होत्या, मात्र आता सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शाळांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी अधिकृत संकेतस्थळावरून वेळापत्रक डाउनलोड करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे.
विद्यार्थी आणि पालकांनी आता तयारीला लागा — परीक्षा जवळ येत आहेत!

Comments are closed.