राज्यभरात बारावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असताना, परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. परीक्षा मंडळाने यंदा सर्व केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही असणे बंधनकारक केले असतानाही, मुंबई विभागातील काही केंद्रांवर ही सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
मुंबई विभागात एकूण परीक्षा केंद्रांपैकी 8.65 टक्के म्हणजेच 58 केंद्रांवरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. यामध्ये सर्वाधिक 35 केंद्रे मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम आणि मुंबई उत्तर या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत.
मुंबई पश्चिमेत 20, मुंबई दक्षिणेत 14 तर मुंबई उत्तरमध्ये 1 केंद्र सीसीटीव्हीविना आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे.
येत्या मंगळवारी सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीची अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.