मोबाईलवर आधीच ‘हायवे अलर्ट’!-Highway Danger Alerts Now on Mobile!

Highway Danger Alerts Now on Mobile!

हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! NHAI ने रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी करून एक विशेष मोबाईल-आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम सुरू केली आहे.

Highway Danger Alerts Now on Mobile!या तंत्रज्ञानामुळे महामार्गावर पुढे कोणता धोका आहे—धुके, अपघात-प्रवण जागा, भटके जनावरं किंवा अचानक वळणे—हे युजरच्या मोबाईलवर आधीच कळणार आहे.

ही सेवा सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून काही महामार्गांवर सुरू होईल आणि नंतर देशभर लागू होईल. SMS, WhatsApp आणि हाय-प्रायोरिटी कॉल द्वारे अलर्ट दिले जाणार आहेत. जिओचे ५० कोटी युजर्स प्रवास करताना रिअल-टाइम माहिती मिळवू शकतील.

ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असून जिओच्या 4G–5G नेटवर्कवर आधारित आहे. यामुळे महामार्ग सुरक्षा, अपघात नियंत्रण आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट मजबूत होण्याची अपेक्षा आहे. तसेच ही प्रणाली राजमार्ग यात्रा अॅप आणि हेल्पलाइन 1033 सोबत जोडली जाणार आहे.

Comments are closed.