एमपीएससीला उच्च न्यायालयाचा झटका!-High Court Slams MPSC!

High Court Slams MPSC!

100% दृष्टीदोष असलेल्या तरुणीला लिपिक-क-टंकलेखक (वर्ग क) पदासाठी नियुक्त न केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) वर उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. तिच्या पेक्षा कमी गुण मिळवलेल्या 39 उमेदवारांची निवड झाली होती, ज्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

High Court Slams MPSC!याचिका आणि सुनावणी

शबाना पिंजारी या तरुणीने अ‍ॅड. सुमीत काटे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दिली होती. न्यायालयाच्या एम. एस. कर्णिक आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी तरुणीच्या वतीने युक्तीवाद केला.

तरुणीला 100% कायमचे अंधत्व असून, तिने लिपिक-क-टंकलेखक (वर्ग क) पदासाठी प्राथमिक व मुख्य परीक्षा 192.48 गुणांसह उत्तीर्ण केली होती. तरीही तिला नियुक्तीपासून वंचित ठेवले गेले होते.

न्यायालयाचे ताशेरे

न्यायालयाने म्हटले की, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या पदावर नियुक्तीसाठी अनेक पर्याय असताना, अनारक्षित खुल्या प्रवर्गातील पद उपलब्ध करून देणे न्यायाची थट्टा आहे.

Comments are closed.