सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागाने मोठी अपडेट दिली आहे. बारावी पास ते पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. आरोग्य अधिकारी (गट-अ) पदांच्या १,४४० जागा (Community Health Officer – Contractual) भरावयाच्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://nhm.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी अर्जासाठी सर्व माहिती व लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन भरावा आणि भरती प्रक्रियेदरम्यान अद्यावत माहिती मिळविण्याची जबाबदारी स्वतःची आहे.

Comments are closed.