Maharashtra University of Health Sciences अंतर्गत हिवाळी २०२५ टप्पा-४ मधील लेखी परीक्षा २३ मार्चपासून सुरू होत असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत. राज्यभरातील १७५ केंद्रांवर या परीक्षा पार पडणार असून सुमारे ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग तसेच एमडी, एमएस, एमबीए आणि एमएस्सी अशा विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
परीक्षार्थ्यांनी सकाळच्या सत्रासाठी सकाळी ९ वाजता आणि दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता म्हणजेच किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका परीक्षा दिवशीच ऑनलाइन प्रणालीद्वारे केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत, तसेच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून डिजिटल पद्धतीने तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे.

Comments are closed.