केंद्रप्रमुख आता ‘समन्वयक’-Headmasters Now ‘Coordinators’!

Headmasters Now ‘Coordinators’!

राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत केंद्रप्रमुख पदाचं नाव आता ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ असं ठेवलं जात आहे. शासनाने याबाबत नवीन निर्णय जाहीर केला आहे. केंद्रप्रमुख पदासाठी लागणाऱ्या अर्हता आणि भरतीची पद्धत तशीच राहणार आहे.

Headmasters Now ‘Coordinators’!जिल्हा परिषदेच्या मंजूर पदसंख्येच्या आधारे समान वाटप होईल. जर पदसंख्या विषम असेल, तर तो अतिरिक्त पद पदोन्नती कोट्यात मिळेल.

या पदांसाठी ४,८६० पदं लवकरच भरली जाणार आहेत, ज्यात अर्धी पदोन्नतीने आणि अर्धी स्पर्धा परीक्षेतून भरती केली जाईल. पात्र उमेदवारांमध्ये किमान ६ वर्षे सेवा पूर्ण असलेले प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक असतील.

ही पदोन्नती परीक्षा सामाजिक आरक्षणाशिवाय होईल, परंतु दिव्यांगांना आरक्षण दिले जाईल. २०२३ मध्ये परीक्षा न झाल्यामुळे पूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, फक्त माहिती सुधारता येईल.

Comments are closed.