महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्याची ठरवलेली केंद्रप्रमुख पदाची परीक्षा काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित केली जाणार आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
या बदलामुळे इच्छुक उमेदवारांना १ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. मूळ अर्जाची मुदत आधी १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली होती, पण आता ती वाढवण्यात आली आहे.
ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख पदावर नियुक्तीसाठी घेतली जाणार आहे. मूळत: परीक्षा १ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले होते.
पुढे ढकलल्यामुळे अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, परीक्षेची पात्रता आणि अनुभव ही १ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मानली जाईल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.