हाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवेसाठी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केलीय. ही परीक्षा येत्या २१ सप्टेंबरला होणार असून, अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट ठेवण्यात आलीये. बँकेच्या चलनाद्वारे शुल्क भरणाऱ्यांसाठी अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे.
या भरतीत उद्योग निरीक्षक – ३९, तांत्रिक सहायक – ९, कर सहायक – ४८२, आणि लिपिक-टंकलेखक – १७ अशा मिळून एकूण १६१८ जागा भरण्यात येणार आहेत.
१ जूनला झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच लागलाय, ज्यात २६,७४० उमेदवार पात्र ठरले.
मुख्य परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
पात्र उमेदवारांनी आपल्या पसंतीप्रमाणं पदवर्ग व नियुक्ती प्राधिकरण निवडून अर्ज भरायचं आहे.

Comments are closed.