परीक्षा-इंटरव्ह्यूशिवाय सरकारी नोकरी!-Govt Job Without Exam or Interview!

Govt Job Without Exam or Interview!

सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Engineers India Limited (EIL) या केंद्र सरकारच्या PSU कंपनीत Management Trainee (MT) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण 52 जागा उपलब्ध आहेत.

Govt Job Without Exam or Interview!विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. उमेदवारांची निवड थेट GATE 2025 च्या गुणांवर आधारित केली जाणार आहे.

या भरतीमध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या शाखांसाठी जागा देण्यात आल्या आहेत. केमिकलसाठी 12, मेकॅनिकलसाठी 14, सिव्हिलसाठी 18 आणि इलेक्ट्रिकलसाठी 8 अशा एकूण 52 पदांची संधी आहे. या पदांसाठी आकर्षक पगार देण्यात येणार असून दरमहा सुमारे 1.8 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील BE/BTech/BSc इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे आणि किमान 65% गुण असणे गरजेचे आहे. तसेच GATE 2025 मध्ये पात्र ठरणे अनिवार्य आहे. 2024 किंवा 2025 मध्ये पदवी पूर्ण केलेले किंवा सध्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. सरकारी क्षेत्रात चांगल्या पगारासह करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

Comments are closed.