भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)नं 976 ज्युनियर एग्जीक्यूटिव्ह पदांकरिता भरती; त्वरित करा अर्ज ! – Govt Job via GATE !

Govt Job via GATE !

सरकारी नोकरी म्हंजेच अनेक तरुणांचं स्वप्न! आणि जर ही नोकरी एकाही परीक्षा न देता, थेट GATE स्कोअरवर मिळत असेल, तर बघा भाऊ, ही सुवर्णसंधीच!

Govt Job via GATE !भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)नं 976 ज्युनियर एग्जीक्यूटिव्ह पदांकरिता भरती जाहीर केली आहे. यात आर्किटेक्चर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT अशा शाखांमध्ये भरपूर जागा आहेत. अर्ज भरायची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे.

या भरतीत विशेष म्हणजे कुठलीच लेखी परीक्षा नाय! फक्त GATE 2023, 2024 किंवा 2025 चा स्कोअर लागतो. निवड GATE मार्कांवरून होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि गरज पडली तर मुलाखत.

पगार कसा?
सरळ 40,000 ते 1,40,000 पर्यंतचा स्केल, शिवाय HRA, DA, PF, मेडिकल अशा सगळ्या सुविधा मिळणार. वर्षभराचा एकूण CTC जवळपास 13 लाख रुपये होतो.

योग्यता काय पाहिजे?
BE/B.Tech किंवा IT साठी MCA लागतो. कमाल वय 27 वर्ष, पण राखीव प्रवर्गासाठी सूट आहे.

अर्ज कसा करायचा?
👉 www.aai.aero या साईटवर जा
👉 “Careers” मध्ये जाऊन AAI Junior Executive Recruitment 2025 निवडा
👉 तुमचा ईमेल आणि मोबाईल वापरून रजिस्ट्रेशन करा
👉 सर्व माहिती भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा
👉 फी भरून अर्ज सबमिट करा

फी:
OBC/Gen/EWS – ₹300
SC/ST/PWD/महिला – ₹0

Comments are closed.