महाराष्ट्र शासनाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण 179 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, या भरतीमध्ये विधी सहाय्यक, लघुलेखक (उच्च व कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांसह महत्वाचे पद समाविष्ट आहेत.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. उमेदवार 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तसेच अर्जासाठी लागणारी सर्व पात्रता आणि अनुभव तपासून घेणे गरजेचे आहे.
पदांचा तपशील
धर्मादाय आयुक्त कार्यालयात रिक्त असलेल्या पदांचा तपशील असा आहे:
- विधी सहाय्यक – 3 जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – 2 जागा
- लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) – 22 जागा
- निरीक्षक – 121 जागा
- वरिष्ठ लिपिक – 31 जागा
अर्ज शुल्क आणि सवलती
खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये, तर मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी शुल्क माफ आहे. अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक माहिती
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर प्रोफाइल तयार करणे किंवा अपडेट करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे अनिवार्य आहे. फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- अधिकृत संकेतस्थळ: https://charity.maharashtra.gov.in
- जाहिरातीची PDF: https://charity.maharashtra.gov.in/Portals
- अर्जाची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/
परीक्षा पद्धत
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा आधारित असेल. परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, तर्कशास्त्र आणि विषय-विशिष्ट ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.
- विधी सहाय्यक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदांसाठी: 200 गुण, 2 तासांचा कालावधी
- लघुलेखक पदांसाठी: 120 गुण, 1 तास, त्यानंतर 80 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा
पात्रता निकष आणि कागदपत्रे
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे व प्रत्येकी दोन स्व-प्रमाणित प्रत सादर करावी. तसेच वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
उमेदवारांसाठी संदेश
ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरेल. उच्च पगारासह सरकारी नोकरीसाठी अर्ज करून, उमेदवार आपल्या करिअरला उज्ज्वल दिशा देऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

Comments are closed.