10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी!-Govt Job Opportunity for 10th Pass!

Govt Job Opportunity for 10th Pass!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या Armoured Vehicle Nigam Limited (HVF) मध्ये 122 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

Govt Job Opportunity for 10th Pass!या भरतीमध्ये मेकॅनिस्ट, फिटर, रिगर, मटेरियल हँडलिंग ऑपरेटर, हीट ट्रीटमेंट ऑपरेटर तसेच शॉट ब्लास्टर अशा विविध तांत्रिक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रासोबत NAC/NTC/STC सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्सही आवश्यक आहे.

या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत अर्ज फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.

  • अर्जाची अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2026
  • अर्ज शुल्क: ₹300

ही भरती तांत्रिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी मानली जात आहे.

Comments are closed.