सरकारी नोकरीच्या शोधात? दहावी पास झालात तर ही सुवर्णसंधी नक्की वाचा! | 10th Pass? Golden Govt Job Opportunity!

10th Pass? Golden Govt Job Opportunity!

जर तुम्ही दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये लवकरच तब्बल २,२२८ नवीन पदांची भरती केली जाणार आहे.

10th Pass? Golden Govt Job Opportunity!

राज्य सरकारने या पदनिर्मितीस मान्यता दिली असून, यामुळे अनेक तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मंत्रिमंडळाची मंजुरी:
मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी हे पदनिर्मिती मंजूर करण्यात आली आहे. या भरतीमुळे न्यायालयीन कामकाज अधिक वेगवान होईल आणि माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढेल.

पदांची माहिती:
न्यायालयात सहसा सहाय्यक, टंकलेखक (लिपिक), कॉपीस्ट, परीक्षक अशा पदांवर भरती होते. टंकलेखक पदासाठी टायपिंग येणे आवश्यक आहे.

पात्रता आणि तयारी:

  • दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार सहभागी होऊ शकतात.
  • स्पर्धा परीक्षा व भरतीसाठी तयारी करणाऱ्यांनी आतापासूनच अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे.
  • वेतन, अनुदान आणि अन्य खर्च मंजूर झाले असल्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.