पोलीस शिपायांसाठी सुवर्णसंधी!-Golden Opportunity for Police Constables!

Golden Opportunity for Police Constables!

राज्यातील पोलीस शिपायांसाठी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवण्याची महत्त्वाची संधी पुन्हा उघडली आहे. सामान्यतः पीएसआय पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली जाते.

Golden Opportunity for Police Constables!पण ज्या शिपायांना ती परीक्षा पूर्ण करणे जमले नाही, त्यांच्यासाठी मर्यादित विभागीय परीक्षा आयोजित केली जात आहे. या माध्यमातून अनुभवी पोलीस शिपायांना पीएसआय पदावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

पदांचे वाटप पुढील प्रमाणे असेल:

  • ५०% पदे – सरळ सेवा

  • २५% पदे – मर्यादित विभागीय परीक्षा

  • २५% पदे – पदोन्नती

मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र उमेदवार:
पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत कर्मचारी.

शैक्षणिक पात्रता आणि सेवा कालावधी:

  • १० वी उत्तीर्ण – किमान ६ वर्ष अखंड सेवा

  • १२ वी उत्तीर्ण – किमान ५ वर्ष अखंड सेवा

  • पदवीधर – किमान ४ वर्ष अखंड सेवा

  • वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे; मागासवर्गीयांना ५ वर्ष शिथीलता

अर्ज करताना उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरु नसावी. कार्यालयातून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा लेखी व शारीरिक चाचणी यांचा समावेश असेल. गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केले जातील आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.

ही परीक्षा अनुभवी पोलीस शिपायांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे, ज्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखली जाईल.

Comments are closed.