नोकरीची सुवर्णसंधी !! IFFCO मध्ये पदवीधर उमेदवारासाठी ; जाणून घ्या अर्ज कसा करायचा !

Golden Job Opportunity for Graduates at IFFCO; When Can You Apply?

0

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने कृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी (AGT) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. B.Sc कृषी पदवीधारक उमेदवार या संधीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे.

Golden Job Opportunity for Graduates at IFFCO; When Can You Apply?

शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कृषी विषयात B.Sc पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी किमान 60% गुण मिळवलेले असावेत. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.

निवड प्रक्रिया
IFFCO AGT भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाइन चाचणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर केली जाणार आहे. देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, नागपूर, गुवाहाटी, पटना, रायपूर, पुणे, हैदराबाद, भोपाल, जबलपूर आणि इतर प्रमुख शहरे समाविष्ट आहेत.

पगार किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांसाठी 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असेल. यामध्ये प्रति महिना ₹33,000 वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना ₹37,000 प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज कसा कराल?
IFFCO AGT भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी agt.iffco.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर “Click Here to Register” वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर, “Login Here” वर क्लिक करून अर्ज भरावा आणि आवश्यक ती माहिती भरून सबमिट करावा. शेवटी अर्जाची प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी जतन करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.