दिल्लीत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-Golden Govt Jobs in Delhi

Golden Govt Jobs in Delhi

0

दिल्लीमध्ये जाऊन काम करण्याची सुवर्णसंधी! सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) मार्फत मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1732 पदे भरण्यात येणार आहेत, त्यामुळे उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Golden Govt Jobs in Delhiअर्ज प्रक्रिया 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट dda.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

पदांचा तपशील: डिप्यूटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट एग्जिक्युटिव्ह इंजिनिअर, लीगल असिस्टंट, प्लॅनिंग असिस्टंट, आर्किटेक्चर असिस्टंट, प्रोग्रामर, ज्युनियर इंजिनिअर, नायब तहसीलदार, स्टेनोग्राफर, पटवारी, ज्युनियर सचिवालय सहाय्यक, माळी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार 10वी पास ते पदव्युत्तर पर्यंत आहे.

निवड प्रक्रिया कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT), स्किल/टायपिंग/स्टेनोग्राफर टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट या टप्प्यांतून केली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मेरिट यादी जाहीर केली जाईल, ज्याद्वारे अंतिम निवड निश्चित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.