देशभरात आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाली असून, दिल्ली, मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोनं स्वस्त झालं आहे.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२२,१६० प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोनं ₹१,१२,००० प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. गेल्या आठवड्यात सोनं जवळपास ₹९८० प्रति १० ग्रॅमने स्वस्त झालं असून, २२ कॅरेट सोनंही ₹१,१६० रुपयांनी घसरलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरमधील मजबुती आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या “वेट अँड वॉच” धोरणामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. डॉलर मजबूत झाला की गुंतवणूकदार सोन्यातून पैसा काढतात, त्यामुळे भाव कमी होतो.
शहरनिहाय आजचे दर:
- दिल्ली: २४ कॅरेट ₹१,२२,१६० / २२ कॅरेट ₹१,१२,०००
- मुंबई, चेन्नई, कोलकाता: २४ कॅरेट ₹१,२२,०२० / २२ कॅरेट ₹१,११,८५०
- पुणे, बेंगळुरू: २४ कॅरेट ₹१,२२,०१० / २२ कॅरेट ₹१,११,८४०
जागतिक बाजारातही सोनं सध्या $३,९९६.९३ प्रति औंस या दराने व्यवहारात आहे. तरीही Goldman Sachs आणि ANZ Bank सारख्या वित्तसंस्थांनी पुढील काही वर्षांत सोन्याचे दर वाढतील असा अंदाज वर्तवला आहे.
चांदीच्या भावातही घसरण दिसत असून आज भारतात चांदीचा दर ₹१,५२,४०० प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी $४८.४८ प्रति औंस इतकी खाली आली आहे.
तज्ज्ञ सांगतात की सोन्याच्या या तात्पुरत्या घसरणीकडे गुंतवणुकीची संधी म्हणून पाहावं. कारण आर्थिक अस्थिरता, निवडणुका आणि व्याजदरांतील बदल यामुळे लवकरच सोन्याचं आकर्षण पुन्हा वाढू शकतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून नव्हे, तर विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करावी.

Comments are closed.