गुजरात सरकारने जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी 2004 मध्ये GSBTM ची स्थापना केली आणि त्याच अंतर्गत आधुनिक संशोधनाला चालना देण्यासाठी Gujarat Biotechnology Research Centre (GBRC) सुरू करण्यात आले.
आता GBRC मार्फत फार्मा, लाइफ सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री क्षेत्रातील उमेदवारांसाठी विविध फेलोशिप पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे.
या भरतीमध्ये Project Manager, Research Associate, Project Associate-II, Junior Research Fellow (JRF) आणि Lab Technician अशी विविध पदे उपलब्ध आहेत. एकूण अनेक जागांसाठी अर्ज मागवले गेले असून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे.
Research Associate पदासाठी PhD किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक असून दरमहा ₹37,000 ते ₹54,000+HRA पर्यंत फेलोशिप दिली जाईल. Project Manager साठी ₹1,05,400 पर्यंत पगार मिळू शकतो. JRF पदासाठी ₹31,000 + HRA (NET असल्यास) तर नॉन-NET उमेदवारांसाठी सुमारे ₹23,000 मिळतील.
Lab Technician व Project Associate-II सारख्या पदांसाठीही चांगल्या फेलोशिपसह संधी उपलब्ध आहे. या सर्व पदांसाठी संशोधनाचा अनुभव, विशेषतः Bioinformatics, Molecular Biology, NGS किंवा Linux सिस्टमचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- ही सर्व पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असून सुरुवातीला 11 महिन्यांसाठी असतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026
- अर्ज शुल्क: ₹150 ते ₹250 (पदानुसार)
ही संधी विशेषतः Science/Pharma बॅकग्राउंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट आहे, ज्यांना संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे.

Comments are closed.