GATE 2026 निकाल जाहीर! स्कोअरकार्ड डाउनलोड करण्याची संधी! | GATE 2026 result out, download scorecard!

GATE 2026 result out, download scorecard!

GATE Exam दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. GATE 2026 चा निकाल 19 मार्च रोजी जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाले आहे. उमेदवार gate2026.iitg.ac.in या वेबसाइटवर लॉगिन करून आपला निकाल सहज पाहू व डाउनलोड करू शकतात.

GATE 2026 result out, download scorecard!

स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्याचे नाव, पालकांचे नाव, GATE स्कोअर, परीक्षा तारीख, श्रेणी, अखिल भारतीय रँक (AIR) यांसारखी महत्त्वाची माहिती दिलेली असेल. यावर्षी ही परीक्षा 7, 8, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती.

स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Candidate Login’ वर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून सबमिट केल्यावर स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ज्याची प्रिंटही घेता येईल.

GATE परीक्षा ही अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, याच्या आधारे M.Tech, M.E. आणि PhD मध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश पूर्णपणे रँकच्या आधारे दिला जातो. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.