नाशिक विभागात अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थी २० ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या फेरीत जवळपास ६३ हजार रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
नाशिक विभागात एकूण १,२०,२४४ अकरावीच्या जागा आहेत, त्यापैकी सध्या जवळपास ६३,५५६ जागा रिक्त आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ५७,०५५, धुळे जिल्ह्यात १६,६३९, जळगाव जिल्ह्यात ३४,२३४ आणि नंदुरबार जिल्ह्यात १२,३१६ जागा भरल्या जात आहेत. या प्रवेशासाठी चार नियमित व एका विशेष फेरीत प्रक्रिया राबवली जात आहे.
विद्यार्थ्यांनी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचा लॉगिन तपशील तपासावा, तसेच एसएमएसद्वारे देखील प्रवेशाबाबत माहिती मिळणार आहे. याशिवाय, प्रवेशासाठी ‘कट ऑफ लिस्ट’ हीही जाहीर केली जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी मार्गदर्शकांकडे रिक्त जागांची माहिती २३ ऑगस्टपर्यंत देण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणीवर पडली असून, ऑक्टोबरमध्ये पुढील फेरी होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांतील मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांत या फेरीसाठी तयारी सुरु आहे.

Comments are closed.