उन्हाळी सुटीच्या निमित्ताने सायन्स फोरम, एल.जी. मोबाइल लॅब, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ग्रोइंग डॉट्स यांच्या सहकार्याने मोफत ऑनलाइन छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या छंदवर्गाचा विषय ‘मनोरंजनातून विज्ञान’ असून, विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना देण्याचा यामागचा उद्देश आहे.
- दिनांक: ३ मे ते ८ जून
- वेळ: प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी ११ ते १२.३०
- माध्यम: मराठी, हिंदी व इंग्रजी मिश्र भाषेत
या छंदवर्गात महाराष्ट्रातील नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात भाभा अणु संशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, नेहरू विज्ञान केंद्र, एलजी मोबाइल सायन्स लॅबोरेटरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क या संस्थांतील तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे.
छंदवर्गातील विशेष उपक्रम:
- दैनंदिन वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी बनवणे
- वैज्ञानिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणे
- विविध वैज्ञानिक उपकरणांचे कार्य समजावून घेणे
- तर्कशक्ती आणि विश्लेषण कौशल्य वाढवणे
- जेनेरेटिव्ह AI चा वापर करून विज्ञान शिक्षण प्रभावी बनवणे
नोंदणीसाठी लिंक: https://nashik.com/science-forum
दोन गट:
- पहिली ते पाचवीचे विद्यार्थी
- सहावी ते दहावीचे विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन पाहून स्वतः प्रयोग करणे, उपकरणे तयार करणे, आणि शंका विचारणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १,८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही सुवर्णसंधी दवडू नका – आजच नोंदणी करा!