Food Safety and Standards Authority of India (FSSAI) कडून एप्रिल–जून 2026 तिमाहीसाठी इंटर्नशिपची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. FSSAI Internship Scheme 2024 अंतर्गत ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणारी मोठी संधी आहे.

या इंटर्नशिपमध्ये Food Safety, Standards, Regulation, Legal, IT, HR, Imports अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असून ही इंटर्नशिप FSSAI मुख्यालय (नवी दिल्ली), प्रादेशिक कार्यालये (मुंबई, चेन्नई, गाझियाबाद) तसेच राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळांमध्ये (कोलकाता, रक्सौल इ.) दिली जाणार आहे.
या इंटर्नशिपसाठी Food Technology, Life Sciences, Chemistry, Microbiology, Nutrition, Law, Management, Journalism, IT अशा विविध शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून 17 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे आणि 27 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे. इंटर्नशिप कालावधी किमान 2 महिने ते जास्तीत जास्त 6 महिने असा राहील. निवड झालेल्या पात्र इंटर्नना संपूर्ण कालावधीसाठी ₹10,000 स्टायपेंड दिला जाईल तसेच यशस्वी पूर्णतेनंतर अधिकृत प्रमाणपत्रही मिळेल.
इच्छुक उमेदवारांनी fssai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, सुरू असलेला कोर्स, इंटर्नशिपसाठी प्राधान्य क्षेत्र व ठिकाण याची माहिती भरावी लागेल.
काही प्रकरणांमध्ये छोटा लेख किंवा प्रेझेंटेशनही सादर करावे लागू शकते. अर्जांची निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आधारित असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची उत्तम संधी असून प्रत्यक्ष कामाचा अनुभव, स्टायपेंड आणि प्रमाणपत्र या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी ही संधी अजिबात दवडू नये आणि अंतिम तारखेपूर्वीच अर्ज पूर्ण करावा.

Comments are closed.