महिला व बाल विकास विभागात नवी भरती जाहीर झालीये हो! महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत विविध पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 होणार आहे.
या भरतीत अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी (गट-ब राजपत्रित) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) या पदांचा समावेश आहे.
अर्ज पात्रता म्हणून महिला व बाल विकास किंवा ग्रामविकास विभागातील संबंधित संवर्गातील कर्मचारीच पात्र असतील. तसेच अर्जदाराकडे सात वर्षांची नियमित सेवा, संगणक प्रमाणपत्र आणि मराठी-हिंदी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा प्रक्रिया: लेखी परीक्षा ४०० गुणांची आणि मुलाखत ५० गुणांची असेल. अंतिम निवड दोन्ही गुण एकत्र करून केली जाणार आहे.
शुल्क: सामान्य प्रवर्गासाठी ₹719, मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹449 शुल्क आहे.
परीक्षा केंद्र: फक्त नवी मुंबई येथे परीक्षा घेतली जाणार आहे.
वेतन: पगार मॅट्रिक्स 9 ते 15 प्रमाणे ₹41,800 ते ₹1,32,300 पर्यंत + इतर भत्ते मिळतील.
अधिक माहितीसाठी आणि सविस्तर जाहिरातीसाठी wcd.nic.in या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

Comments are closed.