महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात मेहनत करणाऱ्या कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. एमबीओसीडब्ल्यूमार्फत राबवली जाणारी घरगुती भांडी संच वाटप योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे कामगार कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे.
नोंदणीकृत कामगारांना १७ प्रकारच्या एकूण ३० दर्जेदार भांडींचा संच पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.
हा संच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असून घरखर्चात बचत होण्यास मदत करणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी एमबीओसीडब्ल्यूमध्ये वैध नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. आधार कार्ड व नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने अपॉइंटमेंट बुक करून घरबसल्या अर्ज करता येतो. जिल्हा व तालुकानिहाय आयोजित शिबिरांमध्ये अपॉइंटमेंटनुसार हा भांडी संच वितरित केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्यासोबतच त्यांना शासनाकडून सन्मानाची व सुरक्षिततेची भावना मिळणार आहे. पात्र कामगारांनी वेळ न दवडता अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करून या मोफत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.