रेशनकार्डधारक महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. होळीच्या सणानिमित्त अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाची लहर उमटणार आहे.
राज्यभरात मोफत साडी वाटप!
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकार अंत्योदय योजनेच्या लाभार्थी महिलांना मोफत साडी देणार आहे. जालना जिल्ह्यातील ४४,१६० आणि पुणे जिल्ह्यातील ४८,८७४ महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
होळीपूर्वी साडी वाटप पूर्ण!
रेशनकार्डधारक महिलांना मिळणारी ही मोफत भेट म्हणजे सरकारकडून खास सणासुदीचं गिफ्ट आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी!
गेल्या वर्षी फाटक्या आणि निकृष्ट साड्या दिल्याच्या तक्रारी आल्याने यंदा सरकारने गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
- साडी घेताना ती नीट तपासून घ्या.
- निकृष्ट दर्जाची असेल, तर त्वरित तक्रार करा.
- पुरवठा विभागाकडून साडींची तपासणी केली जाणार आहे.
यावर्षी सरकारने विशेष तरतूद करून स्थानिक स्वस्त धान्य दुकानांमार्फत साड्यांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी वेळेत आपला हक्काचा लाभ घ्यावा!