सरकारनं बेरोजगार तरुणांसाठी भारी संधी दिलीय. रेल्वे कौशल्य विकास योजनेतून फुकटात ट्रेनिंग मिळणार हाय. तुमचं शिक्षण १०वी झालं असेल, आणि वय १८ ते ३५ च्या दरम्यान असेल, तर तुम्हीही अर्ज करू शकता.
ज्यांच्याकडं रोजगार नाय, पण काम शिकून पुढं जायचं हाय, त्यांच्यासाठी ही योजना एकदम उपयोगाची हाय. ट्रेनिंग झाल्यावर प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) पण दिलं जातं. आणि पुढं नोकरीची संधी देखील!
काय लागतं अर्जासाठी?
भारतातले नागरीक असायला हवं
१०वी (किंवा १२वी) पास असावं
वय १८ ते ३५ च्या आत
कायमचं काम नसलं पाहिजे
ट्रेनिंग किती दिवसांचं?
– साधारण 3 आठवड्यांचं (192 तास)
कुठं अर्ज करायचं?
– रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा.
– नावनोंदणी करून, सगळी माहिती आणि कागदपत्रं अपलोड करा.
ट्रेनिंग झाल्यावर प्रमाणपत्र कुठं मिळेल?
– ज्या केंद्रात ट्रेनिंग घेतलं, तिथून मिळेल किंवा ऑनलाइन डाउनलोड करता येईल.

Comments are closed.