आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील महिलांसाठी 2026-27 या वर्षात सैन्य व पोलिस भरतीपूर्व विशेष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या अंतर्गत हे प्रशिक्षण मोखाडा तालुक्यातील पळसुंडे येथे 1 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना करिअरची नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुक महिलांची निवड 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. त्याच दिवशी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून अंतिम निवड यादी 2 एप्रिल रोजी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या महिलांना पुढील प्रशिक्षणाबाबत स्वतंत्र माहिती देण्यात येईल.
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराची किमान उंची 150 सें.मी., वजन 45 किलो असावे आणि वय 18 ते 26 वर्षे दरम्यान असावे. तसेच किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत आणि नाव नोंदणी प्रमाणपत्र अशी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. प्रशिक्षण केंद्रात भोजनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी 7350346066 / 8830993688 या क्रमांकांवर संपर्क साधावा. हा उपक्रम एसटी महिलांसाठी सैन्य व पोलिस क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची मोठी संधी ठरणार आहे.

Comments are closed.