राज्यातील मुलींसाठी मोठी खुशखबर! ‘मोफत शिक्षण योजना’ लागू! | Free Education Scheme for Girls!

Free Education Scheme for Girls!

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील पात्र मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याची योजना राबवली जात आहे. या योजनेमुळे शिक्षणाअभावी मागे पडणाऱ्या गरीब व मागासवर्गातील मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Free Education Scheme for Girls!

योजनेचे मुख्य उद्दिष्ट
मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवणे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डिग्री, डिप्लोमा तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी ही योजना लागू आहे.

कोणत्या मुलींना मिळणार लाभ?
ही योजना महाराष्ट्राच्या स्थायी रहिवासी असलेल्या मुलींसाठी आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच EWS, SEBC आणि OBC प्रवर्गातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या गटातील मुलींनी डिग्री, डिप्लोमा, पदव्युत्तर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेला असल्यास त्यांना मोफत शिक्षण मिळेल.

कोणते अभ्यासक्रम मोफत असणार?
या योजनेअंतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, कृषि, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, फार्मसी आणि इतर मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.

कोणता खर्च शासन भरणार?
या योजनेत ट्यूशन फी आणि परीक्षा फी १००% माफ केली जाते. ही सवलत सरकारी, अर्ध-सरकारी व मान्यताप्राप्त महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये लागू असेल. मात्र खाजगी स्व-निधीत संस्थांमध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यात प्रवेश घेतल्यास काही अटी लागू होऊ शकतात.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?
पात्र मुलींनी MahaDBT पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात/SEBC/EWS प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

योजनेची अंमलबजावणी कधीपासून?
ही मोफत शिक्षण योजना 2024–25 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आली आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या तसेच आधीपासून शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय निश्चितच क्रांतिकारी ठरणार आहे.

Comments are closed.