मुलींसाठी शिक्षण मोफत! – Free Education for Girls!

Free Education for Girls!

महाराष्ट्रात मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेत आणखी एक मोठा टप्पा पुढे आला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिडनहॅम महाविद्यालयात यास्मिन सर्वेअर यांच्या पदवी शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात शिक्षण शुल्क माफीची मोठी घोषणा केली.

Free Education for Girls!आता मुलींच्या शिक्षणासाठी ‘इतर शुल्का’ जसं की प्रयोगशाळा, विकास शुल्क अशा सर्व शुल्कांतूनही मुक्तता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुलींचं उच्च शिक्षण वाढवण्यासाठी सरकारने ८४२ अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ केले आहे, पण इतर शुल्कामुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे लवकरच त्या सर्व ‘इतर शुल्का’पासूनही मुक्तता होईल, असं मंत्री पाटील यांनी आश्वासन दिलं.

यावेळी सिडनहॅम महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी आणि आशियातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर यास्मिन खुर्शीदजी सर्वेअर यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली असून, संस्थांना इतर शुल्क कमी करण्यासाठी सूचना दिल्या जातील, नाही तर शुल्क माफीसाठी कायदे तयार केले जातील, असंही सांगितलं गेलं.

यास्मिन सर्वेअर यांचा महाविद्यालयात अर्धपुतळा बसवण्यात आला असून त्याचा अनावरण मंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.

Comments are closed.