स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे! आता जेईई, नीट आणि यूपीएससी नागरी सेवा परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्यात येणार आहे. या योजनेत यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSU) अधिकारी-श्रेणी भरती परीक्षांचा समावेश आहे. तसेच, जेईई, नीट, कॅट, सीएलएटी यांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण सुविधा मिळणार आहे.
पीएम केअर्स योजनेअंतर्गत मोफत कोचिंग: केंद्र सरकारच्या PM CARES योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि यूपीएससी नागरी सेवा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी मोफत करता येणार आहे. SC आणि OBC विद्यार्थ्यांना तसेच PM CARES योजनेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांसाठी जात आणि उत्पन्नाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
या परीक्षांसाठी मिळेल मोफत कोचिंग: UPSC, राज्य लोकसेवा आयोग, बँक, विमा कंपन्या आणि PSU अधिकारी भरती परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, जेईई, नीट, कॅट, सीएलएटीसारख्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठीही प्रशिक्षण मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना GRE, GMAT, IELTS, TOEFL, SAT परीक्षांसाठीही मोफत कोचिंग दिले जाणार आहे. याशिवाय, NDA आणि CDS परीक्षांसाठीही प्रशिक्षण उपलब्ध असेल.
पात्रता आणि निवड प्रक्रिया: दरवर्षी ३,५०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, यापैकी ७०% जागा SC तर ३०% जागा OBC विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. प्रत्येक श्रेणीतील ३०% जागा महिला उमेदवारांसाठी असतील. PM CARES लाभार्थ्यांसाठी कोणतीही संख्यात्मक मर्यादा नाही. अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे आणि बोर्ड परीक्षेत किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. केंद्रीय विद्यापीठांच्या पॅनेलद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाईल, तर PM CARES अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि लवकरात लवकर अर्ज करावा!