सैन्यदलासाठी मोफत प्रशिक्षण!-Free Army Officer Training!

Free Army Officer Training!

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांसाठी एसएसबी परीक्षेची तयारी करण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस हजर राहावे.

Free Army Officer Training!निवास व भोजन:
प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना निःशुल्क निवास व भोजन उपलब्ध करुन दिले जाईल.

आवश्यक पात्रता:

  • सीडीएस किंवा एनडीए परीक्षा उत्तीर्ण उमेदवार.

  • एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उत्तीर्ण.

  • एसएसबी कॉल लेटर किंवा शिफारस केलेली यादी असणे आवश्यक.

  • टेक्निकल सॅज्युएट कोर्स संबंधित पात्रता असलेले.

मुलाखत कशी आणि कधी द्यावी?
मुलाखतीसाठी आवश्यक प्रवेशपत्र www.mahasainik.maharashtra.gov.in वरून डाउनलोड करा आणि प्रशिक्षणाच्या वेळी तीन प्रती सोबत घेऊन १७ सप्टेंबरपर्यंत मुलाखतीस हजर राहा.

अधिक माहिती:

  • ईमेल: tr*****************@***il.com

  • फोन: ०२५३-२४५१०३२, व्हॉट्सअप: ९१५६०७३३०६

लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी अधिक माहिती दिली आहे.

Comments are closed.