प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना न्याय द्या!-Fill Vacancies from the Waiting List!

Fill Vacancies from the Waiting List!

प्रतीक्षा यादीत असलेल्या शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरावीत आणि न्यायालयीन प्रकरणांतील शिक्षकांना योग्य पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांमधून तीव्र होत आहे.

Fill Vacancies from the Waiting List!या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन शिक्षकांच्या अडचणी मांडल्या. चर्चेदरम्यान समायोजन प्रक्रिया, मुख्याध्यापक पदोन्नतीपूर्वी समुपदेशन आदेश, तसेच शैक्षणिक अडचणी असलेल्या शाळांमध्ये तात्पुरती शिक्षक व्यवस्था यांसारख्या अनेक तातडीच्या विषयांवर चर्चा झाली.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.

या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, संतोष हुमनाबादकर, अन्वर मकानदार, बाबासाहेब माने, आणि चरण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.