महत्वाचे! – लाडक्या बहिणींना खुशखबर फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार…!

February Installment to be Released Soon !

0

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांनीही लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने कठोर छाननी मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आता राज्यभरात छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

February Installment to be Released Soon !

योजनेसाठी आवश्यक निधीला अर्थ विभागाने मंजुरी दिली असून, लवकरच डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे रक्कम वितरित केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पूर्वी अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या २.३० लाख लाभार्थी महिला, ६५ वर्षांहून अधिक वयाच्या १.१० लाख महिला, कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या १.६० लाख महिलांचा समावेश होता. सरकारच्या छाननीनंतर या योजनेतील लाभार्थींच्या पात्रतेविषयी अधिक स्पष्टता आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.