पोलीस भरतीसाठी बनावट पोर्टल उघडकीस आल्याने सायबर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भावी पोलीस उमेदवारांसाठी हा धोका असून, अशा फेक पोर्टलवर आधार क्रमांक, बँक डिटेल्स किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. ही माहिती दिल्यास आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे.
testmsp.mahaitgov.in/Forms/Home.aspx या लिंकवर चालणारा पोर्टल बनावट असल्याचे पुणे सायबर सेलने स्पष्ट केले आहे.
या पोर्टलने पोलीस भरती प्रक्रिया २०२४-२५ साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा केला, पण सत्य बाहेर आले की हा कोणत्याही अधिकृत पोलीस भरती प्रक्रियेचा भाग नाही.
सायबर पोलिसांनी उमेदवारांना फक्त अधिकृत सरकारी वेबसाइट्स आणि पोलीस विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट https://www.mahapolice.gov.in असून, इतर कोणत्याही पोर्टलवर माहिती देऊ नका.

Comments are closed.