राज्यातील उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्राध्यापक भरतीच्या 6 ऑक्टोबरच्या जीआरवर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले. या निकषांमुळे अनेक नेट–सेट पात्र उमेदवार भरतीतून बाहेर राहणार होते.
काही विषयांना उमेदवारच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण होत असल्याचे कुलगुरूंनी आणि अधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले.
या सर्व तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने भरतीचे सूत्र 75:25 वरून पुन्हा 50:50 करण्याचा निर्णय घेतला असून, दुरुस्त केलेला नवीन जीआर मंजुरीसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
विद्यापीठांमधील जवळपास 600 पदांसाठी भरती सुरू असून, बदललेल्या निकषांमुळे अर्जदारांची संख्या घटल्याचेही निदर्शनास आले होते. आता नव्या सुधारित निकषांमुळे नेट–सेट उत्तीर्ण उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार आहे.

Comments are closed.