EPFOचं घरासाठी गिफ्ट!-EPFO’s Home Gift!

EPFO’s Home Gift!

काय सांगू साहेब, नोकरदार वर्गासाठी एकदम भारी बातमी आलीये! EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना – यांनी पीएफ फंड काढायच्या नियमात खूप मोठा बदल केला.

EPFO’s Home Gift!आता जे लोक आपलं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहात होते, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता घराच्या डाऊन पेमेंटसाठी थेट पीएफमधून पैसे काढता येणार.

म्हणजे काय, तर ज्या कर्मचाऱ्यांचं PF खातं ३ वर्षं जुना आहे, ते आता ९० टक्के पर्यंत रक्कम काढू शकतात. एक नंबरचा निर्णय झालाय हा!

पण… एक गोष्ट लक्षात ठेवायची हाय – EPFO म्हणतंय, रिटायरमेंट फंडाकडे दुर्लक्ष नका करू. नीट नियोजन करा, मगच किती रक्कम काढायची हे ठरवा.

काय फायदे?
➡️ घर घेणं सोपं
➡️ नोकरदार वर्गाला दिलासा
➡️ रिअल इस्टेटला बूस्ट

आता पर्यंत जे लोक पैशाअभावी घराचं स्वप्न बघत थांबले होते, त्यांच्यासाठी हाच EPFOचा निर्णय म्हणजे आशेचा किरण!

Comments are closed.