कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही एक महत्त्वाची बचत योजना आहे, ज्यामध्ये कर्मचारी थोड्या-थोड्या रकमेची गुंतवणूक करून निवृत्तीसाठी मोठा निधी तयार करू शकतात. या योजनेत दरमहा नियमित गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो.
तुम्ही नुकतेच नोकरीला लागला आहात?
जर तुम्ही नुकतेच नोकरी सुरू केली असेल, तर आताच या योजनेत गुंतवणूक सुरू करून कोट्यधीश होण्याची संधी मिळवू शकता. सातत्य आणि संयम बाळगल्यास, काही वर्षांतच तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता. या योजनेअंतर्गत ठराविक रक्कम दर महिन्याला PF खात्यात जमा केली जाते आणि कालांतराने त्याचा मोठा फंड तयार होतो.
PF योजनेचे फायदे
- दरमहा बचत – कर्मचाऱ्याच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जाते.
- सुरक्षितता आणि परतावा – या योजनेत सरकार 8.25% व्याजदर देते.
- निवृत्तीनंतर मदत – सेवानिवृत्तीनंतर हा निधी मोठा आर्थिक आधार ठरू शकतो.
- पेन्शन लाभ – किमान 10 वर्षे नोकरी केल्यास पेन्शन मिळण्याची संधी.
- नॉमिनी सुविधा – PF खात्यात इच्छेनुसार नॉमिनी जोडता येतो.
कोट्यधीश कसे बनाल?
जर तुम्ही 30 वर्षे नोकरी केली आणि दरमहा 7,200 रुपये PF खात्यात गुंतवले, तर 30 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 1.10 कोटी रुपये जमा होऊ शकतात.
नियमित बचत हाच यशाचा मंत्र
थोडी थोडी रक्कम सातत्याने गुंतवल्यास, भविष्यात मोठा निधी उभा करता येतो. EPFO योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे, मात्र कुठल्याही निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
(सूचना: वरील माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर देण्यात आलेली आहे. कोणतेही आर्थिक निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)