पीएफओ पैसे आता सहज काढा!-EPFO withdrawals now easy!

EPFO withdrawals now easy!

केंद्र सरकारने कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या खात्यातील १००% रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पूर्वी ईपीएफओत तेरा प्रकारचे नियम होते, पण आता हे नियम फक्त तीन प्रकारात सोप्या करण्यात आले आहेत:

EPFO withdrawals now easy!

  • गरजांसाठी – आजारपण, शिक्षण, लग्न
  • घरासाठी
  • विशेष कारणांसाठी

शिक्षणासाठी दहा वेळा आणि लग्नासाठी पाच वेळा पैसे काढता येतील. आंशिक पैसे काढण्यासाठी आता किमान १२ महिने सेवा कालावधी आवश्यक आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी: घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळेल. ‘ईपीएफओ’ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला असून, प्रमाणपत्रासाठी केवळ ५० रुपये शुल्क, तेही ईपीएफओ भरणार आहे.

दंड कमी केला: कंपन्यांनी उशिरा पैसे भरल्यास लागणारा दंड आता फक्त १% पर्यंत मर्यादित केला आहे.

किमान खात्यात ठेवावी लागणारी रक्कम: प्रत्येक सदस्याने खात्यात किमान २५% रक्कम ठेवणे बंधनकारक, जेणेकरून निवृत्तीनंतर मोठी बचत तयार राहील.

Comments are closed.