नोकरीची सुवर्णसंधी : ईपीएफओत २३० पदांची भरती सुरू! यूपीएससीमार्फत ‘ईपीएफओ’ (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्था – श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत) मध्ये दोन पदांसाठी
भरती होणारे –
➤ एन्फोर्समेंट ऑफिसर / अकाऊंट्स ऑफिसर (EO/AO)
➤ असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर (APFC)
एकूण जागा: २३०
➤ EO/AO – १५६ पदं (पगार: लेव्हल ८ – अंदाजे ₹92,200/महिना)
➤ APFC – ७४ पदं (पगार: लेव्हल १० – अंदाजे ₹1,13,200/महिना)
पात्रता: कुठल्याही शाखेतील पदवीधर
अधिक पात्रता (अॅडिशनल): कंपनी लॉ, लेबर लॉ, किंवा पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा
वयोमर्यादा:
➤ कमाल वय: ३५ वर्षं (१८ ऑगस्ट २०२५ रोजी)
➤ राखीव प्रवर्गासाठी सूट: इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० ते १५ वर्षे
निवड प्रक्रिया:
➤ लेखी परीक्षा (MCQ – हिंदी/इंग्रजी)
कालावधी: २ तास | निगेटिव्ह मार्किंग: १/३
➤ विषय: इंग्रजी, राज्यघटना, लेबर लॉ, चालू घडामोडी, अकाउंटिंग, संगणक, अर्थशास्त्र वगैरे
➤ इंटरव्ह्यू: १०० गुण
लेखी + मुलाखत निकाल एकत्र करून अंतिम निवड केली जाईल (७५:२५ प्रमाणात)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ ऑगस्ट २०२५
अर्ज साठी संकेतस्थळ: https://www.upsconline.nic.in
संपर्क:
📞 हेल्पलाईन: 011-24041001 (सकाळी १० ते संध्या ५.३०)
📧 ई-मेल: up*****@*ic.in (तांत्रिक अडचणीसाठी)

Comments are closed.