नवउद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनांचे जाहीर! | Startup Schemes Announced for Entrepreneurs!

Startup Schemes Announced for Entrepreneurs!

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जेनिसिस (GENESIS) उपक्रमांतर्गत देशभरातील नवोन्मेषी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये “मॅचिंग इन्व्हेस्टमेंट निधी योजना” आणि “पायलट प्रकल्प निधी योजना” यांचा समावेश आहे. या योजनांद्वारे पात्र नवउद्योजकांना त्यांच्या तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांना गती देण्यासाठी अनुक्रमे ५० लाख आणि ४० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Startup Schemes Announced for Entrepreneurs!

मॅचिंग इन्व्हेस्टमेंट निधी योजना
या योजनेअंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन किवा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअप्सना ५० लाख रुपयांपर्यंत निधी सहाय्य दिले जाईल. पात्रता ही खालीलप्रमाणे आहे: भारतात नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (किमान ५१% भारतीय मालकी), डीपीआयआयटी मान्यता प्राप्त स्टार्टअप, टिअर दोन किंवा टिअर तीन शहरातून कार्यरत असणे, बाजारपेठेसाठी तयार उत्पादन किवा सॉफ्टवेअर असणे, पूर्वी टाइड २.० किंवा समृद्ध योजनेतून निधी न मिळालेला असणे. अर्ज bit.ly/GENESIS_PFC या संकेतस्थळावर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे.

पायलट प्रकल्प निधी योजना
या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना ४० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते जे खासगी उद्योगसंस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किवा मोठ्या औद्योगिक गटांसोबत प्रत्यक्ष पायलट प्रकल्प राबविण्यासाठी वापरले जाईल. पात्रतेसाठी डीपीआयआयटी मान्यता आवश्यक असून कार्यक्षम नमुना तयार असणे आणि संस्थापक पूर्णवेळ उपक्रमाशी निगडित असणे आवश्यक आहे. अर्ज bit.ly/GENESIS_PILOT या संकेतस्थळावर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०२५ आहे.

या योजनांद्वारे मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (MAGIC) या मान्यताप्राप्त स्टार्टअप इंक्युबेटर केंद्रातून स्टार्टअप्सना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले जाईल आणि ग्रामीण तसेच उपनगरी भागातील नवउद्योजकांना संधी उपलब्ध होईल.

Comments are closed.