2025-26 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) प्रवेश प्रक्रियेची चौथी व अंतिम फेरी आता सुरू झाली आहे. 2 सप्टेंबर 2025 पासून ह्या फेरीची सुरुवात झाली असून, 4 सप्टेंबर ही कॉलेज व शाखा स्वीकृतीची अंतिम तारीख आहे.
विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी अजून प्रवेश निश्चित केलेला नाही. हे विद्यार्थी अधिक चांगल्या कॉलेज किंवा शाखा (Branch) मिळेल, या आशेने आतापर्यंत वाट पाहत होते. त्यामुळे अंतिम फेरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘Core Branches’ ना प्राधान्य
दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक शाखांना जसे मागणी आहे, तसेच पारंपरिक ‘Core Branches’ जसे की:
Mechanical Engineering
Electrical Engineering
Civil Engineering
Electronics & Telecommunication
यांनाही चांगली पसंती मिळतेय. अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी या शाखांमध्ये प्रवेश घेतल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे या शाखांची कट-ऑफ्स (Cut-off Marks) पातळीही वाढलेली दिसतेय.
सत्राची सुरुवात आणि वेळापत्रक
या वर्षी 12वीचे निकाल लवकर लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियाही वेळेत सुरू झाली होती. तरीही, तांत्रिक कारणांमुळे प्रक्रियेचे टप्पे दीर्घकाळ चालले. त्यामुळे प्रथम वर्षाचे सत्र 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. मागील वर्षी ते 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले होते, त्यामुळे फारसा फरक नाही.
संस्थात्मक स्तरावर प्रवेशाची संधी
चौथी फेरी ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (CAP Round 4) ची शेवटची फेरी असून, यानंतर उरलेली रिक्त पदे संस्थांना त्यांच्या स्तरावर भरता येतील. अशा संस्थात्मक प्रवेशासाठी (Institute-level Round) 13 सप्टेंबरपर्यंत वेळ असेल.

Comments are closed.