इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांचा पाठस्पीन!-Engineering Admissions Dip!

Engineering Admissions Dip!

इंजिनिअरिंगच्या पहिल्या फेरीला फक्त ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतलाय! म्हणजे जवळपास १ लाख १२ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या संधीपासून दूर राहिलेत.

Engineering Admissions Dip!सीईटी कक्षानं ही फेरी नुकतीच घेतली होती. ३१ जुलैला जेव्हा पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली, तेव्हा १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं. पण प्रवेशाच्या कालावधीत फक्त २५ हजार ६५० जणांनीच अ‍ॅडमिशन घेतलं.

म्हणून ३ ऑगस्टला एक दिवस वाढवला. पण त्यातही फक्त ६,९८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामुळे एकूण आकडा ३२ हजारांवरच अडकून पडलाय.

ही परिस्थिती बघून एक गोष्ट ठळक दिसते – खाजगी कॉलेजांवरून विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय. इतके उच्च गुण मिळवलेले विद्यार्थीही आता अ‍ॅडमिशन घेत नाहीयेत.

जर हाच ट्रेंड पुढेही राहिला, तर ही शिक्षणव्यवस्थेसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.

पुढील टप्पा:

  • रिक्त जागांची यादी – ५ ऑगस्ट

  • अर्ज आणि पसंतीक्रम – ६ ते ८ ऑगस्ट

  • दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट

  • प्रवेश – १२ ते १४ ऑगस्ट

  • तिसऱ्या फेरीतील जागांची घोषणा – २२ ऑगस्ट

विद्यार्थ्यांनो, निर्णय तुमच्या हातात आहे – पण वेळेवर योग्य पाऊल उचला!
शिक्षणाचं भविष्य गंभीर वळणावर आहे

Comments are closed.