पालिका पर्यावरण विभागात अभियंतेच गायब!-Engineer Posts Vacant in BMC!

Engineer Posts Vacant in BMC!

मुंबईतल्या वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेला महापालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सध्या अक्षरशः मनुष्यबळाअभावी ठप्प झाल्याचं चित्र समोर आलंय.

Engineer Posts Vacant in BMC!गेल्या दीड वर्षांपासून या विभागात अभियंत्यांची तब्बल 42 पदं रिक्त आहेत — यात उपप्रमुख अभियंता 2, कार्यकारी अभियंता 2, सहाय्यक अभियंता 5 आणि दुय्यम अभियंता 33 अशी पदं समाविष्ट आहेत.

ऑक्टोबर 2024 मध्ये मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आलेल्या या विभागाकडे सध्या कोणीही लक्ष देत नाही. नगर अभियंता विभागाकडूनही पदभरतीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. परिणामी, शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासह पर्यावरणीय देखरेखीची अनेक कामं अधांतरी राहिली आहेत.

पालिका प्रशासन प्रदूषण रोखण्यात आधीच अपयशी ठरत असताना, या रिक्त पदांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. आता आयुक्त भूषण गगराणी यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.