विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढलाय! तब्बल 44 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय. या झळाल्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय घेतला. विदर्भातील सर्व शाळांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करावा, अशा सूचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांशी सल्लामसलत करून नवीन परीक्षा वेळापत्रक ठरवावं, असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे. यंदा राज्य सरकारनं संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला असला तरी, विदर्भाच्या तीव्र उन्हामुळे इथल्या शाळांनी याला जोरदार विरोध केला.
विदर्भातील शाळांनी शिक्षण मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर कोर्टात याची दाखल घेतली गेली आणि काल उशिरा सुनावणीत कोर्टानं विदर्भातील परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे ठरवण्यास परवानगी दिली.
राज्य शिक्षण महामंडळाची विनंती:
राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विदर्भातील शाळांमध्ये 15 एप्रिलपूर्वी परीक्षा पार पाडाव्यात, अशी मागणी केली आहे.
आजपासून परीक्षा सुरू:
दरम्यान, आजपासून (8 एप्रिल) पहिली ते नववीच्या परीक्षा सुरू होत असून, 1 कोटी 45 लाख विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. यंदा नववीसाठी प्रथमच पॅट (नियतकालिक मूल्यमापन चाचणी) प्रणाली लागू करण्यात आली आहे.