लाडकी बहिण योजनेत आता आणखी काही महत्त्वाचे बदल होणार असल्याचं बोललं जातंय. ई-केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर जवळ आली असताना, विशेषतः ज्या महिलांच्या पती किंवा वडिलांचं निधन झालं आहे, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वेबसाईटमध्ये तांत्रिक सुधारणा करत आहे.

आत्तापर्यंत ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक होतं; पण पती-वडील नसलेल्या महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करणं अशक्य होत होतं. आता या महिलांना फक्त स्वतःचा आधार नंबर प्रमाणित करून ‘अपूर्ण ई-केवायसी’ करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र ही अपूर्ण प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी करावी लागणार आहे. पुढील निर्णय नंतर सरकार घेणार आहे.
ई-केवायसी कुठे करायची?
ई-केवायसी करण्यासाठी शासनाने अधिकृत पोर्टल
https://ladakibahin.maharashtra.gov.in
उपलब्ध करून दिलं आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवरूनही सहज करता येते.
पती किंवा वडील नसलेल्या महिलांनी काय करावं?
अनेक महिलांना—
- पती आणि वडील दोघांचे निधन
- विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या
- अविवाहित आणि वडील हयात नसलेले
यांना कोणाचा आधार टाकायचा? हा प्रश्न निर्माण झाला होता.
या सर्व महिलांसाठी आता तांत्रिक सुधारणा होत असून, त्यांना फक्त स्वतःचा आधार कार्ड नंबर प्रमाणित करून अपूर्ण ई-केवायसी करावी लागेल. मात्र इतर नातेवाईकांचे आधार कार्ड वापरू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
योजनेत मिळणारा लाभ
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 मिळतात. ऑक्टोबर महिन्याचा हप्ताही जमा झाला आहे. पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिलांना मात्र दरमहा ₹500 मिळतात.

Comments are closed.