e-KYC चुकली? हप्ता थांबला!-e-KYC Error, Payment Stopped!

e-KYC Error, Payment Stopped!

लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली आणि त्याचा थेट परिणाम हप्त्यावर झाला. या तक्रारी गंभीरपणे घेत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

e-KYC Error, Payment Stopped!ज्या ठिकाणी e-KYC मध्ये त्रुटी आढळल्या आहेत, तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC ची मुदत देण्यात आली होती; मात्र तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे काही महिलांची नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे की, पात्र महिलांचा लाभ थांबू नये यासाठी क्षेत्रीय स्तरावर पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात हप्ता बंद झाल्याने महिलांनी संतप्त आंदोलन केल्याचं चित्र दिसून आलं असून प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची मागणी होत आहे.

Comments are closed.