लाडकी बहीण ई-केवायसीला दिलासा?-E-KYC Deadline Relief for Ladki Bahin?

E-KYC Deadline Relief for Ladki Bahin?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चर्चेनुसार आता ३१ जानेवारीपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

E-KYC Deadline Relief for Ladki Bahin?मात्र, यासंदर्भात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाला अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम कायम आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असून, प्रक्रियेची सुरुवात १८ सप्टेंबरपासून झाली होती. सुरुवातीला १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली, त्यानंतर ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट अडचणी, तांत्रिक समस्या, माहितीचा अभाव आणि कागदपत्रांतील त्रुटींमुळे अनेक महिलांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे.

सध्या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध असली, तरी अंतिम तारखेबाबत स्पष्ट आदेश नसल्यामुळे प्रशासनाकडून ठोस सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत पत्रकाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे. योजनेतील पारदर्शकता आणि पात्र लाभार्थींनाच आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसीची अट लागू करण्यात आली आहे.

Comments are closed.