महाराष्ट्रातील महिलांना दिल्या जाणाऱ्या लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा मिळून ₹३००० चा हप्ता लवकरच जमा होणार आहे. राज्य सरकारकडून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे.
योजनेअंतर्गत हजारो महिलांना नियमित आर्थिक मदत दिली जाते आणि महिन्याचा खर्च हलका व्हावा यासाठी सरकार सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहे.
अनेक महिलांनी हप्ता कधी जमा होणार याबाबत विचारणा केल्याने आता कामकाज वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.
सध्या बँक तपासणी, लाभार्थ्यांच्या तपशीलांची पडताळणी आणि जिल्हास्तरावरील मान्यता प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे काही दिवसांतच दोन्ही महिन्यांचा मिळून हप्ता त्यांच्या खात्यात दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.